तुकाराम सुपेची वकिलांना धक्कादायक माहिती Saam Tv
मुंबई/पुणे

TET Exam Scam | मला माझं आयुष्य संपवावसं वाटतंय, तुकाराम सुपेची वकिलांना धक्कादायक माहिती

मला बळीचा बकरा केलं जातं असल्याचा धक्कादायक दावा तुकाराम सुपेने केला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : मला माझं आयुष्य संपावस वाटतंय, अशी धक्कादायक माहिती टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटकेत असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेने वकिलांना दिलीये. त्याशिवाय त्याने मला बळीचा बकरा केलं जातं असल्याचा धक्कादायक खुलासा तुकाराम सुपेने केला आहे. - (I want to end my life Tukaram Supe gave shocking information to the lawyer)

तुकाराम सुपे नेमकं काय म्हणाला?

मला माझं आयुष्य संपावस वाटतंय. मला टार्गेट केलं जात असून यामुळे मला आत्महत्या कराविशी वाटतेय, अशी माहिती तुकाराम सुपेने (Tukaram Supe) वकिलांना दिली. अटकेत असलेल्या सुपेच्या कुटुंबातील लोकांनाही आता आरोपी करणार असल्याची पुणे (Pune) पोलिसांची तयारी आहे, असे आरोपही त्याने केलंय.

हेही वाचा -

मी तपासात संपूर्ण सहकार्य करतोय. मात्र, पोलीस खोलपर्यंत तपास करणार का? मला बळीचा बकरा केलं जातं असून यामध्ये अजून काही लोकं आहेत. 2017 मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे. 2017 ला या कंपन्यांना कुणी आणलं याचा तपास झाला तर सगळे हाती लागतील, असंही सुपेने सांगितलंय. तुकाराम सुपे यांचे वकील मिलिंद पवार यांनी याबाबतची माहिती दिलीये.

टीईटी परीक्षा पेपर (TET Exam) फुटी घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख, आणि अभिषेक सावरीकर यांची नावे सामोर आल्या नंतर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT