अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने डोक्यात वीट मारून केली पत्नीची हत्या SaamTvNews
मुंबई/पुणे

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने डोक्यात वीट मारून केली पत्नीची हत्या

घटनेनंतर पतीने शेजारी असणाऱ्या जंगलात पळ काढला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

पनवेल : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात वीट मारून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल (Panvel) तालुक्यातील चिंचवली गावात विट भट्टीवर काम करणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्याच पत्नीच्या डोक्यात विट मारून तिची हत्या केली. घटनेनंतर पतीने (Husband) शेजारी असणाऱ्या जंगलात पळ काढला. या घटने संदर्भात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा :

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जंगलात पळून जाणाऱ्या पतीला ताब्यात घेत त्याला अटक केली. पतीची चौकशी केली असता आपल्या पत्नीचे (Wife) दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याने आपण हे कृत्य केल्याचे सांगितले. पती पत्नी मध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत होते आणि याच वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT