मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट; मुंबईतील BJP नगरसेविकेच्या नवऱ्याला अटक  विकास मिरगणे
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट; मुंबईतील BJP नगरसेविकेच्या नवऱ्याला अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याविषयी नवी मुंबईमध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली

विकास मिरगणे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याविषयी नवी मुंबईमध्ये एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट त्याने सोशल मीडियावर (Social Media) केली होती. तसेच ती पोस्ट व्हायरल (viral) करण्याचा देखील प्रयत्न केला होता. या आक्षेपार्ह पोस्टने काही शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा-

कोपरखैरणे पोलिसांनी (Koparkhairane Police) याप्रकरणी कलम 154 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संदीप म्हात्रे याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. भाजप (BJP) कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांची पत्नी (Wife) कोपरखैरणे भागामध्ये नगरसेविका (Corporator) आहेत. संदीप म्हात्रे कोपरखैरणे भागामध्ये त्यांच्या सामाजिक कामांमुळे प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. संबंधित पोस्ट व्हायरल झाल्यावर काही शिवसैनिकांनी (Shiv Sainik) त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी म्हात्रे यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. म्हात्रे यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्यावतीने शिवसैनिकांची माफी मागितली होती. पण संदीप म्हात्रे यांनी माफी मागितली नाही. यामुळे शिवसैनिकांनी पोलीस ठाणे गाठले आहे. शिवसैनिकांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कौपरखैरणे पोलिसामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. त्यांनी सर्व प्रकरण समजून घेऊन, परिस्थिती चिघळू नये किंवा कोणताही वाद वाढू नये याकरिता त्यांनी थेट कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी संदीप म्हात्रे विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस संदीप म्हात्रे याना आता कोर्टात हजर करणार आहेत. यावेळी त्यांना जामीन मिळतो का, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. संदीप म्हात्रे यांचा एकंदरीत स्वभाव आणि कार्यपद्धतीने ते प्रसिद्ध आहेतच. मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवून असा त्यांचा प्रयत्न होता. येणाऱ्या महापालिका निवडणुकाकरिता अशापद्धतीने आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि त्यामधून मताचे गणित बांधता येणार, असा प्रयत्न होता. पण त्यांचा हा प्रयत्न त्यांच्याच चंगळच अंगलट आला आहे, अशी चर्चा सध्या कौपरखैरणेमध्ये सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

दिवंगत संतोष देशमुखांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात दिली भेट

Death News: 'रेड सॉईल स्टोरीज'च्या पूजा गवसवर दुःखाचा डोंगर; पतीनंतर अवघ्या सहा महिन्यांत जवळच्या व्यक्तीचं निधन

दादा माफ करा, मला मरायचं नव्हतं…, शिक्षकाने आयुष्य संपवलं, व्हिडिओसह ४ पानी सुसाइड नोट

SCROLL FOR NEXT