लाथा-बुक्यांनी मारहाण करत केला पत्नीचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार SaamTV
मुंबई/पुणे

लाथा-बुक्यांनी मारहाण करत केला पत्नीचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यातील (Pune) भवानी पेठ परिसरामध्ये घरगुती कारणाने झालेल्या वादातून पतीने पत्नीला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे : पुण्यातील (Pune) भवानी पेठ परिसरामध्ये घरगुती कारणाने झालेल्या वादातून रागवलेल्या पतीने पत्नीला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा -

आसमा तौसिफ हवारी/शेख असे खून झालेल्या विवाहितीचे नाव आहे. आसमाने मूलं सतत भांडण करतात आणि त्रास देत असल्याची तक्रार पती तौफिक केली होती याच तक्रारीवरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. वाद झाल्यानंतर पतीने पत्नीला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून पोलिसांनी आरोपी पती तौफिक नूरहंसन हवारी/शेख याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तौसिफ शेख याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. यातील एक मुलगा आणि मुलगी अबनॉर्मल आहेत आणि त्यांच्या त्रासाची तक्रार आसमा नवऱ्याकडे करत असे कालही यातूनच वाद झाला, आणि तौफिकने आसमाला मारहाण केली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT