Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणे हादरलं! बायको आणि 8 वर्षांच्या मुलाची हत्या; मग सॉफ्टवेअर इंजिनीअरनं स्वत:लाही संपवलं

Pune Software Engineer News: पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News: बायको आणि मुलाची हत्या करुन नवऱ्याने स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीला आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदिप्तो गांगुली असं 44 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयरचं नाव आहे. सुदिप्तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते पश्चिम बंगालचे असल्याचीही माहिती समोर येत आहे. (Crime News)

सुदिप्तो यांनी पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाची आधी हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि मुलाच्या चेहऱ्याला प्लास्टिक पिशवी गुंडाळून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुदिप्तो यांच्या पत्नीचा भावाने अनेकदा घरी फोन केले. मात्र कुणीही फोन उचलला नाही. त्यानंतर संशय आल्याने त्याने पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांना अधिक तपास केला त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली? याचा अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर

SCROLL FOR NEXT