Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

पत्नीसह सासरच्या जाचाला कंटाळुन 29 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सतीष भोगाडे आणि सुवर्णा यांच्या विवाह थाटामाटात झाला मात्र काहीच दिवसांत दोघांमध्ये वाद सुरु झाले.

रोहिदास गाडगे

पुणे: विवाहनंतर काहीच दिवसांत आपलं जबरदस्तीनं लग्न झाल्याचे सांगत पतीबरोबर पत्नी भांडण करु लागली याच भांडणात सासरच्यांनी हि त्रास सुरु केल्याने खेड तालुक्यातील खरपुडी येथील 29 वर्षीय पतीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतिष भोगाडे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीष भोगाडे आणि सुवर्णा यांच्या विवाह थाटामाटात झाला मात्र काहीच दिवसांत दोघांमध्ये वाद सुरु झाले.

माझे लग्न जबरदस्तीने लावले असुन मी तुझे नावही लावणार नाही असं म्हणत पत्नी सुवर्णा माहेरी निघुन गेली, यावेळी पती-पत्नीच्या भांडणात सुवर्णाला माहेरच्यांनी साथ देत सतीषला मारहाण आणि शिवगाळ केली त्यामुळे सतीषने झाडाला गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पत्नी सुवर्णासह सासू सासरे, मेव्हणा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

SCROLL FOR NEXT