खळबळजनक : पुण्यात बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या!  अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

खळबळजनक : पुण्यात बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या!

लॉकडाऊनच्या काळात पतीचं काम बंद झाल्यामुळे तो गावी निघून गेला होता. गावावरून परत आल्यानंतरही तो कामावर जात नव्हता. गेली काही दिवस तो घरीच बसून होता. त्यामुळे बायको सारखे टोमणे मारायची!

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

पुणे : आत्तापर्यंत सासरच्या जाचाला किंवा नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बायकोने आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना आपण ऐकल्यात, मात्र, पुण्यातील (Pune) उरुळी कांचन परिसरात बायकोच्या (wife) त्रासाला कंटाळून चक्क नवऱ्याने (Husband) आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. आत्महत्येनंतर जवळपास एक महिन्यांनी सुसाईड नोट सापडली त्यानंतर बायकोविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण घटनेच्या एक महिन्यानंतर मृत तरुणानं लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.

हे देखील पहा :

याप्रकरणी पोलिसांनी (Police) पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महावीर उत्तम जगदाळे असं आत्महत्या केलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे, तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नी रजनी महावीर जगदाळे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघंही पती पत्नी मोल मजुरी करून घर चालवत होते. पण लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात पतीचं काम बंद झाल्यामुळे तो गावी निघून गेला होता. गावावरून परत आल्यानंतरही तो कामावर जात नव्हता. गेली काही दिवस तो घरीच बसून होता.

यामुळे रजनी यांनी आपल्या पतीची तक्रार सासऱ्यांकडे केली. समजूत घातल्यानंतरही मृत महावीर कामाला जात नव्हता. यामुळे पती पत्नीत वाद होऊ लागले होते.  पत्नी उठता बसता आपल्या पतीला टोमणे मारू लागली. आरोपी पत्नीच्या त्रासाला कंटाळून महावीर याने 8 नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यामुळे बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘संत सेवालाल महाराज’ यांचे नाव

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

SCROLL FOR NEXT