husband brother and father-in-law knife attacked the woman in Curry road area Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: कौटुंबिक वाद विकोपाला, चुलत दीराचं वहिनीसोबत भयानक कृत्य; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: कौटुंबिक वादातून दीर आणि चुलत सासऱ्याने महिलेसह तिच्या सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

Satish Daud

Mumbai Crime News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून जीवघेणे हल्ले तसेच खूनासारख्या गंभीर घटना घडत आहेत. अशीच एक घटना करी रोड परिसरातून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून दीर आणि चुलत सासऱ्याने महिलेसह तिच्या सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत महिलेसह तिची सासू जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर पोलिसांनी (Police) संशयित आरोपींना अटक केली आहे. श्रीधर फडतरे (वय २८) आणि चारुदत्त फडतरे (वय ६८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितांमध्ये कौटुंबिक वाद होता. या वादातून त्यांनी महिलेसह तिच्या सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला (Crime News) केला. या हल्ल्यात महिलेसह तिच्या सासूला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताडी पिण्यावरून वाद, ३६ वर्षीय तरुणाची हत्या

मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली. काजूपाडा येथे ताडी पिण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की एका मित्राने दुसऱ्याची हत्या केली. खुर्शीद उर्फ रिजवान शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी शेरअली अहमद शेख याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT