HSC Result: प्रतिक्षा संपली या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता Saam Tv
मुंबई/पुणे

HSC Result: प्रतिक्षा संपली या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता

दहावीच्या निकालानंतर (SSC Result) बारावीच्या निकालाचे (HSC Result) वेध लागले आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे: दहावीच्या निकालानंतर (SSC Result) बारावीच्या निकालाचे (HSC Result) वेध लागले आहे. आता बारावीच्या निकालासाठीही अधिक काळ प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विभागीय बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी बोर्डाच्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवर बारावीचे शाळा स्तरावरचे मूल्यांकन ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर आता बोर्डाकडून निकालाची पुढील प्रक्रिया सुरू झाली असून येत्या दोन-तीन दिवस लागण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद विभागीय बोर्डाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला असून आता बारावीच्या निकालासाठी अधिक वाट पाहावी लागणार नाही. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी निकाल जाहीर होऊ शकतो. मात्र निकाल जाहीर करण्याबाबत राज्य मंडळाचा अधिकार असल्याने राज्य मंडळाकडूनच त्याबाबतची तारीख जाहीर केली जाईल. आता त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

दहावीचा निकाल लागल्यानंतर याच महिन्यामध्ये बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू होते. प्रत्येक विभागीय मंडळाकडून याचा आढावा घेतला जात होता. दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालासाठी शाळा स्तरावरच्या प्रक्रियाही ऑनलाईन पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालय यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. त्यानंतर विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाकडून पुढील कारवाई सुरू आहे.

औरंगाबाद विभागीय मंडळातील मूल्यांकनाचे काम ९९.९४ टक्के पूर्ण झाले असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. औरंगाबाद विभागीय मंडळातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ७०५ विद्यार्थी या परीक्षा आणि निकालाच्या प्रक्रियेत प्रविष्ट झाले आहेत. त्यासोबत लातूर बोर्डाच्या लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यात ७८ हजार ३२ विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली असून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात २ लाख २४ हजार ७३७ विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT