Baba Siddique Death Case Saam Tv
मुंबई/पुणे

Baba Siddique: बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट कसा शिजला? Y सिक्युरिटी भेदून हत्या? समोर आली A टू Z माहिती

Baba Siddique Death : Y सिक्युरिटी असून ही बाबा सिद्दिकींची हाती आकाशी झाली, याची संपूर्ण माहिती समोर आली आहे.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अजित पवारांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकींना दिलेले सुरक्षा कवच असतानाही भर रस्त्यात तीन माथेफिरूंनी गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारलीय. मात्र सिद्दीकींच्या हत्येचा घटनाक्रम जाणून घेऊ...

सिद्दिकींच्या हत्येचा घटनाक्रम

बाबा सिद्दिकी खेरनगरमधील झिशान सिद्दिकींच्या ऑफिसबाहेर पोहचले होते. रात्री 9.30 वाजता आरोपी रिक्षातून पोहोचले. फटाके वाजवत असताना कारमध्ये बसलेल्या सिद्दिकींवर गोळीबार झाला. 2 आरोपींकडून 9 MM पिस्तूलने 6 राऊंड फायर करण्यात आले. गोळ्या लागल्यानंतर सिद्दिकींना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालायत दाखल होण्यापूर्वीच बाबा सिद्दिकींचं निधन झालं. पोलिसांनी सिद्दिकींच्या हत्येनंतर 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतलं.

बाबा सिद्दीकींच्या हत्येत 4 आरोपी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर चौथा आरोपी तुरुंगात असताना तिघांना मार्गदर्शन करत असल्याची शंकाही पोलिसांना आहे. त्यामुळे त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केलाय. यातून सिद्दीकींच्या हत्येचा कट कसा शिजला? त्याची माहिती समोर आलीय.

कसा शिजला हत्येचा कट?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचं 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात वास्तव्य होतं. 14 हजार रुपये भाड्याच्या खोलीत वास्तव्य करत होते. 4 जणांमध्ये शिजला सिद्दिकींच्या हत्येचा कट. 40 दिवसांपासून आरोपींकडून सिद्दीकींच्या ऑफिसची रेकी सुरु होती. प्रत्येकी 50 हजार रुपये चौघेही वाटून घेणार होते. पंजाबमधील जेलमध्ये तिघे एकमेकांच्या संपर्कात होते. बाबा सिद्दीकींना वाय दर्जाच्या सुरक्षेचं कवच असल्याचा दावा राजकीय नेत्यांनी केलाय. ही वाय दर्जाची सुरक्षा कशी असते? हे जाणून घेऊ...

कशी असते वाय सुरक्षा?

8 ते 11 पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश

वाय सुरक्षेत 1 किंवा 2 कमांडरचा समावेश

1 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसरचाही समावेश

राजकीय नेत्यांकडून वाय दर्जाचा सुरक्षेचा दावा केला जात असला तरी बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. लॉरेन्स बिश्नोई हा तिहार जेलमध्ये आहे. तरीदेखील जेलमध्ये बसून तो हत्येचा कट रचतोय. त्यावरून साम टीव्हीने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत..

बिश्नोई गँगवर 'साम'चे सवाल

बिश्नोई तुरुंगातून हत्येचे कट रचत असेल तर तुरुंगाचा उपयोग काय?

बिश्नोई हत्येचे कट रचत असताना तुरुंग प्रशासन काय करतंय?

बिश्नोई गँगच्या कटाची माहिती गुप्तचर यंत्रणांना का नाही?

तुरुंगात असतानाही लॉरेन्स बिश्नोई गँगने सिद्दू मुसावाला ते बाबा सिद्दीकी अशा अनेकांच्या हत्या केल्यायत. मात्र यानंतरही पोलिसांना हाय प्रोफाईल हत्या रोखण्यात यश मिळत नाही. त्यामुळे बिश्नोई गँगच्याच मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाईची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT