Pune Yerwada Latest Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात अंडी चोरल्याच्या संशयातून महिलेचा विनयभंग; कपडे उतरवण्यास भाग पाडलं, संतापजनक घटना!

Pune Crime News: हॉटेलमधील अंडी चोरल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडलं. इतकचं नाही, तर तिचा विनयभंग देखील करण्यात आला.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे, १८ डिसेंबर २०२३

Pune Yerwada Latest Crime News

हॉटेलमधील अंडी चोरल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडलं. इतकचं नाही, तर तिचा विनयभंग देखील करण्यात आला. हा संतापजनक प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात रविवारी (१७ डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुकेश सिंह पुंन्डील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील (Pune News) येरवडा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. आरोपी मुकेश देखील याच हॉटेलमध्ये कुक म्हणून कामाला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास पीडित महिला हॉटेलमधील किचनमध्ये काम करीत असताना आरोपी मुकेश हा तिथे आला. तू अंडी कुठे लपवून ठेवले असं म्हणत त्याने पीडितेवर अंडी चोरल्याचा (Crime News) आरोप लावला. इतकंच नाही, तर आरोपीने महिलेच्या अंगाची झडती घेत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले.

आरोपीचं कृत्य इथेच थांबलं नाही, तर या प्रकारानंतर जेव्हा महिला घरी निघाली, तेव्हा त्याने तिचा रस्ता अडवला. त्याचबरोबर विनयभंग करीत शेरेबाजी देखील केली. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने येरवडा पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) आरोपी मुकेश सिंह पुंन्डील याच्यावर विनभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात असून घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT