पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर होमगार्डचा मोर्चा सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर होमगार्डचा मोर्चा

होमगार्डच्या विविध मागण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या वर्षा बंगल्यावर पायी मोर्चा साठी राज्यातील शेकडो होमगार्ड पुण्यात जमले आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : होमगार्डच्या Home Guard विविध मागण्यासाठी पुण्याहून Pune मुंबईच्या Mumbai वर्षा बंगल्यावर पायी मोर्चा साठी राज्यातील शेकडो होमगार्ड पुण्यात जमले आहेत. पुण्यात होमगार्डने हे आंदोलन सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणावर ती होमगार्ड पुण्यात दाखल झाले आहेत. बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग काशिनाथ पुराने यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो होमगार्ड पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालया जवळ आंदोलन करत आहेत.

हे देखील पहा-

पोलिस Police भरतीतील 3 टक्के आरक्षणा वरुण 15% करण्याच्या मागणीसह होमगार्डना 365 दिवस काम मिळावे, त्याच बरोबर पोलीस प्रशासनाला प्रमाणे विमा कवच देण्यात यावं 'निष्काम सेवा' हे ब्रीद वाक्य काढावं, आत्महत्या व अपघातात मयत झालेल्या होमगार्डना तत्काळ मदत जाहीर करावी. अशा विविध मागण्या घेऊन होमगार्ड मुंबईच्या दिशेने निघाले होते.

पुणे पोलिसांनी त्यांना याठिकाणी अडवल आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठकीनंतर मुंबईला जाण्यासाठी होमगार्ड आक्रमक झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT