Dombivli news Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli News: डोंबिवलीत फुगे फेकण्यावरून दोन गटात राडा, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

डोंबिवली आजदेपाडा परिसरात फुगे फेकण्यावरून दोन गटात तुफान राडा झाला.

साम टिव्ही ब्युरो

डोंबिवली : राज्यभरात होळीच्या दिवशी होळी पेटवून मोठ्या उत्साहात सण साजरा केला. मात्र काल रात्रीच्या सुमरास डोंबिवली आजदे पाडा परिसरात अतिउत्साही तरुणांमुळे रंगाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळालं. फुगे फेकण्याच्या वादातून येथे दोन गटात हाणामारी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली आजदेपाडा परिसरात फुगे फेकण्यावरून दोन गटात तुफान राडा झाला. एका गटातील तरुणावर दुसऱ्या तरुणाने मुद्दाम फुगा फेकल्याने या दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर काही क्षणातच हाणामारीमध्ये झालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Latest News)

होळी आणि रंगपंचमीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीने सण साजरा करण्याचा आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी काही अतिउत्साही मंडळींकडून रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं या घटनेनिमित्त दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार?

Anjali Bharti: अमृता फडणवीसांवर बोलताना बरळलली, गुन्हा दाखल होताच ताळ्यावर आली! गायिका अंजली भारतींकडून दिलगिरी व्यक्त

Maharashtra Live News Update: शिरपूर पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी; बसमधील प्रवाशाचे 50 हजार चोरणारा 4 तासांत गजाआडवाया

SCROLL FOR NEXT