"Go Back Modi" Hoardings in Pune
"Go Back Modi" Hoardings in Pune  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Narendra Modi: पुण्यात लागले "गो बॅक मोदी" चे होर्डिंग

गोपाल मोटघरे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकास कामाच उदघाटन करणार आहेत. मात्र मोदी यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या दौऱ्याला पुण्यात जोरदार विरोध होऊ लागला आहे. पुणे शहर काँग्रेस (Pune City Congress) पक्षाच्यावतीने भवानी पेठ परिसरामध्ये "गो बॅक मोदी" या आशयाचे होर्डिंग लावले आहेत. कोरोनासाथी बद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा पुणे शहर काँग्रेस पक्षा कडून करण्यात येत आहे. ("Go Back Modi" Hoardings in Pune)

त्यामुळे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भवानी पेठ या ठिकाणी 'मोदी गो बँक'चे होर्डिंग लावले आहेत. मात्र पुणे शहर भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या होर्डिंग बाजीला उत्तर देणे टाळन्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी येत असताना, काँग्रेसच्या होर्डिंग बाजीकडे दुर्लक्ष करणच योग्य होईल. अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी कॅमेरा समोर न बोलता दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT