Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Hit and Run : पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार, पती-पत्नीला उडवलं अन् चालकाने काढला पळ

Pune News: पुण्यात एका डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

Pune Latest News in Marathi: पुणे पुन्हा एकदा पुन्हा हिट अँडच्या घटनेनं हादरलं आहे. येथील कोलाड रस्त्यावर भुकूम ( ता. मुळशी ) येथील गारवा हॉटेल समोर डंपरने दुचाकीस धडक दिलेल्या झालेल्या अपघातात पती आणि पत्नी जागीच ठार झाले आहेत. या अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल काळू सुर्यवंशी आणि त्यांची पत्नी प्रिया (रा. लवळेफाटा) अपघातात जागीच ठार झाले. हा अपघात गुरवारी रात्री एक वाजता झाला. डंपर भुकूमवरून भूगावकडे चालला होता. तसेच सुर्यवंशी भूगावरून भुकूमकडे चालले होते.

डंपर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानी हा अपघात घडला आहे. चालक भरधाव वेगाने डंपर चालवत होता. मोटार सायकलला समोरासमोर धडक दिल्यामुळे दोघे पती आणि पत्नी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. याबाबत अभिजीत दत्तात्रय तरवडे रा. पिरंगुट यांनी फिर्याद दिली.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष गिरगोसावी, संतोष चव्हाण व हवलदार जगदाळे आधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल उरवडे रोडवरील कंपनीत नोकरीस होते. तसेच प्रिया भूगाव येथील क्वूरिफायर कंपनीत नोकरी करत होती. पुण्यातील गणपती पाहण्यास प्रिया गेली होती. भूगाव येथे ती आली होती.

अनिल भूगाव येथून तीला घेऊन लवळेफाटा येथील घरी चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. ज्यात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पोलीस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT