Tragic end to a young IT engineer’s life: 25-year-old woman jumps from 21st floor in Hinjewadi, Pune, leaving behind an emotional note Saam TV News
मुंबई/पुणे

Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी

Hinjewadi Latest News : “सॉरी! माझी जगायची इच्छा संपली आहे,” अशी चिठ्ठी तिच्या खोलीत सापडली. पहाटे साडेचार वाजता अभिलाषा दुचाकीने सोसायटीत आली, लिफ्टने २१ व्या मजल्यावर गेली आणि काही मिनिटांतच आत्महत्या केली.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Pune Hinjewadi news : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली असे म्हणत हिंजवडीमध्ये IT इंजिनिअरने तरूणीने आयुष्य संपवले. २५ वर्षीय तरूणीने पहाटे २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ३१ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव अभिलाषा असं आहे. नैराश्यातून अभिलाषाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.... अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणी अभिलाषा हिने आत्महत्या केली. ३१ मे रोजी पहाटे साडेचार वाजता अभिलाषा हिने २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबि‍रे या २५ वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4 :30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर तिने लिफ्टने २१ व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे ४. ४२ सुमारास आत्महत्या केली . अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याच नमूद करण्यात आलं आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली. या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे सांगितल आहे . प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेल एक सुसाइट नोट सापडली आहे , त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.... असं लिहिलेलं आढळून आल आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT