Pune Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात ब्राम्हण महासभा-राष्ट्रवादी आमने-सामने; दवेंचं डोकं फिरल्याचं ठोंबरे यांचे वक्तव्य

राष्ट्रवादीकडून आमच्या नेत्यांबाबत वाईट वक्तव्य आणि घोषणा दिल्यानुळे आम्ही त्यांना विरोध करत असल्याचं सांगितलं तर ब्राम्हण महासंघाकडून आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे (NCP) आमदार अमोर मिटकरी (Amor Mitkari) यांनी कन्यादान विधीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतला असून मिटकरी यांनी पुरोहीत आणि हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाने (Brahmin Federation) केला आहे. याच पार्श्वभूमिवर अमोल मिटकरी यांनी केलेल्या भाषणाचा निषेध करण्यासाठी आज ब्राम्हण महासंघाकडून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं.

यावेळी ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पारंपरिक वेषात मंत्रघोष करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, यावेळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आणि त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक राष्ट्रवादी आमने - सामने आले.

राष्ट्रवादीकडून आमच्या नेत्यांबाबत वाईट वक्तव्य आणि घोषणा दिल्यानुळे आम्ही त्यांना विरोध करत असल्याचं सांगितलं तर ब्राम्हण महासंघाकडून आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंदोलन करायचं आहे त्यांनी ऑफिसच्या बाजूला करावं. ते महिलांना पुढे करुन काहीही बोलत आहेत. आनंद दवेंच डोक फिरलं असून त्यांना आंदोलनाची चौकट कळत नाही. आम्हीही आंदोलन करतो. मात्र, चौकट राखून करावं असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ढोंबरे पाटील म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Stomach Heat Relief Remedies: उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करतील हे 7 घरगुती उपाय, पचनक्रियाही सुधारेल

SCROLL FOR NEXT