Mumbai School Bus Accident Saam Tv
मुंबई/पुणे

School Bus Accident: मुंबईत भरधाव वेगात जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात, चालकासह अनेक विद्यार्थी जखमी

Mumbai News: सांताक्रुज परिसरात शालेय विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात झाला.

Saam Tv

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईच्या सांताक्रुज परिसरात शालेय विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात झाला. सांताक्रुज पश्चिमेकडील मॅनोर इंटरनॅशनल स्कूलची ही बस असून भरधाव वेगात असल्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात बस चालकासह एकूण सहा जण जखमी झाले आहेत.

यात चार विद्यार्थी आणि बसमधील आया हिचा देखील समावेश आहे अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालकाच्या डोक्याची कवटी देखील फुटली असल्याचे समजते.

सध्या जखमींवर सांताक्रुज येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पालकांनी वाकोला पोलीस ठाण्यात चालका विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाहन चालकाने गाडी चालवताना मद्यपान केले होते का? याबाबत वाकोला पोलीस तपास करत आहेत. मात्र वाहन चालकाकडून झालेल्या या अपघातामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT