bombay high court  saam tv
मुंबई/पुणे

राज्य सरकाला हायकोर्टाचा दिलासा; बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्दची याचिका फेटाळली

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला बहुसदस्यीय प्रभाग रचनेत दिलासा दिला आहे. महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकील ऍड असीम सरोदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी करत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती सय्यद आणि न्यायमूर्ती आहुजा यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली आहे.

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी राज्य सरकारच्या बाजून हजर होते. एक प्रभाग व तीन उमेदवार असणे किंवा केवळ मुंबईत एक प्रभाग एक उमेदवार असणे ही बाब घटनाबाह्य नाही असे मत त्यांनी उच्च न्यायालयात मांडले. अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी किरण कदम विरुद्ध महाराष्ट्र सरकार या २०१९ साली झालेला खंडपीठाच्या निर्णयाचा हवाला देऊन या याचिका टिकाऊ ठरू शकत नाही, असे मत न्यायमूर्ती सय्यद व न्यायमूर्ती आहुजा यांच्या न्यायपीठासमोर मांडले.

हे देखील पाहा

मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नासिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर येथील निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवर होऊ घातलेल्या परिणाम करणारी ही याचिका फेटाळली असल्याने राज्य सरकारला न्यायालयाच्या (Court) निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT