Pune Traffic Jam News ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

Pune Traffic Jam Video: पुणे - सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; अंबादास दानवेंनाही बदलावा लागला मार्ग

Pune Traffic Jam: हडपसर पुलावर गेल्या तासाभरापासून वाहनं अडकून पडली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Pune Traffic Jam News: पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील पुणे-सोलापूर या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या (Pune) हडपसर परिसरात वाहनांच्या लाबं रांगा लागल्या आहेत. हडपसर पुलावर गेल्या तासाभरापासून वाहनं अडकून पडली आहेत. या वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) फटका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही बसला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंबादास दानवेंना आपल्या मार्गात बदल करावा लागला आहे. (Pune Latest News)

पाहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार या वाहतुक कोंडीमुळे रस्त्यावर ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे याच मार्गाने लोणी काळभोरला जाणार होते. मात्र, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंबादास दानवेंना आपल्या मार्गात बदल करावा लागला आहे.

दिवाळीचा सण असल्याने मोठ्या चाकरमानी मोठ्या प्रमाणात पुण्यात आपापल्या घरी येत आहेत, त्यामुळे अतिरिक्त वाहतुक वाढली आहे. शिवाय मोठी आणि अवजड वाहने यांमुळे वाहतुक धीम्या गतीने होते. या प्रचंड मोठ्या वाहतुकीवर नियंत्रण करणाऱ्या वाहतुक पोलिसांची संख्याही कमी असल्याने ही वाहतुक कोंडी होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

SCROLL FOR NEXT