Pune Rain News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain Alert : पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात; खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ

Pune Rain News : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरासह परिसरात बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून पुढील दोन दिवस पुण्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

Satish Daud

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरासह परिसरात बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून पुढील दोन दिवस पुण्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक सखल भागात पाणी साठण्याची शक्यता असल्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जिल्ह्यातील घाट प्रवण क्षेत्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय.

विशेष बाब म्हणजे, मागील आठवड्यात पुणे शहराला (Pune Rain) मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. शेकडो घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. पूरस्थिती लक्षात घेता शहरात बचावपथकाला पाचारण करण्यात आलं होतं.

पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

अशातच हवामान खात्याने (IMD Rain) पुन्हा एकदा शहराला पावसाचा अलर्ट दिल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, पावसाची संततधार सुरू असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणातील एकूण पाणीसाठा जवळपास 90 टक्क्यांवर पोहचला आहे.

पुणेकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला

त्यामुळे पुणेकरांवरील पाणीटंचाईचं संकट दूर झालं असून वर्षभराची चिंता मिटली आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण पाणीसाठा 90 टक्के इतका झाला आहे. पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खडकवासला आणि पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

कोणत्या धरणांमध्ये किती पाणीसाठा?

नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 81.43 टक्के पाणीसाठा जमा झालाय. तर पानशेत 91.76 टक्के, वरसगाव: 86.75 टक्के आणि टेमघर धरणातील पाण्याची टक्केवारी 88.48 इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT