Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यभरात पुढील आठवडाभर तरी आकाश ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : राज्यभरात पुढील आठवडाभर तरी आकाश ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता आठवडाभर तरी राज्यात ही स्थिती कायम राहणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

हे देखील पहा-

मॉन्सूनचा परतीचा प्रवास आणि बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांसह राज्यात विविध भागात दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होत आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे चित्र आठवडाभर पाहायला मिळाले आहे.

पुढील आठवड्यात मात्र सोमवार नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून, गुरुवारी (ता.१४) बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परत एकदा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

उत्तर भारतातून मॉन्सून परतला आहे. शनिवार पर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतातील बहुतेक भागातून माघार घेतली आहे. संपूर्ण राजस्थान, तसेच गुजरात, बिहार आणि झारखंडच्या उत्तर भागातूनही मॉन्सून परतला आहे. पुढील काही दिवस तरी मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक वातावरण असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT