पुण्यासह 'या' जिल्ह्यात पुन्हा पावसाचं कमबॅक Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यासह 'या' जिल्ह्यात पुन्हा पावसाचं कमबॅक

राज्यात पावसाचा जोर वाढणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहेत. त्यानंतर आता अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

हे देखील पहा -

सध्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील बहुतांशी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच सोमवारी (29 नोव्हेंबर) हवामान खात्याने पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रायगड,सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सोमवारी (29 नोव्हेंबर) मुंबईसह, उस्मानाबाद, लातूर,ठाणे, नाशिक आणि नांदेड या सहा जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Edited By - shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT