मुंबई/पुणे

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग; अवघ्या ३ तासात १२४ मिलिमीटर पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप, सोसायटीमध्ये शिरलं पाणी

Pune weather : पुणे शहरात जोरदार पाऊस झाला असून अवघ्या तीन तासात १२४ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलीय.

Bharat Jadhav

वरुणराजाने आज पुणे शहराला झोडपून काढलयं. सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. पावसाने जोर वाढल्यानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचलं. अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. पुण्यातील सकाळनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालीय. संध्याकाळी झालेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. गेल्या काही मिनिटांपासून वाहनं एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसारपुणे शहरातील मुख्य भागात एकूण १२४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उद्याही मुसळधार पाऊस होऊल असा अलर्ट पुणे जिल्ह्याकरीता देण्यात आलाय. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली आहेत. धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत असलेल्याने धरण्यातील पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. खडकवासला धरणातून २५६८ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू, पाटबंधारे विभागाने माहिती दिलीय. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण १०० टक्के फुल्ल झाली आहेत.

पुणे शहरातील मुख्य भागात अवघ्या तीन तासात एकूण १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पुणे हवामान विभागाने दिली माहिती आहे.

शिवाजीनगर: १२४ मिलिमीटर

वडगाव शेरी: ७१.५ मिलिमीटर

कोरेगाव पार्क: ६३ मिलिमीटर

हडपसर: ३८ मिलिमीटर

पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे शिवाजी रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. पुणे उंड्री नगर परिसरामध्ये सोसायटीमध्ये पाणी शिरल्यामुळे बेकायदेशीर नाल्यावर हॉटेल बांधकामामुळे बिल्डरांच्या चुकीमुळे सोसायटीमध्ये पाणी शिरली. चार चाकी गाड्यांची नुकसान झाले आहे.

धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज संध्याकाळी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदी पात्रातील साहित्य, वाहने, जनावरे, टपऱ्या, दुकाने इत्यादी तात्काळ हलविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी करण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तसे निर्देश देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

SCROLL FOR NEXT