घोळ काही संपेना! आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; पण...  Saam Tv
मुंबई/पुणे

घोळ काही संपेना! आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; पण...

परीक्षेच्या एक दिवस आधी पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि गट 'ड' च्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

डॉ. माधव सावरगावे

मुंबई: परीक्षेच्या एक दिवस आधी पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि गट 'ड' च्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, गट क ची परीक्षा २४ ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच या परीक्षांच्या नऊ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. परीक्षांसदर्भात आज पार पडलेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी याची घोषणा केली. परंतु राज्य सरकारकडून घोळ काही संपेना कारण ३१ ऑक्टोबर रोजी टीईटीची देखील परीक्षा आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यभरातून विद्यार्थांनमध्ये संतापाची लाट उसळली होती. अनेक विद्यार्थी आपल्या गावावरुन परीक्षेसाठी निघालेही होते. परंतु परीक्षा अचानक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर विरोक्षी पक्षाने राज्य सरकारवर अनेक टीका केली. परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. ब्लॅक लिस्टेड कंपनीला काम कसंकाय दिलं, ही परीक्षा MPSC च्या अंडर का होत नाही असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. राज्य सरकारने लवकरात लवकर परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले, आणि आज तारखा जाहिर केल्या आहेत. त्याने उमेदवारांना थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

परंतु त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेले अनेक पदवीधर आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे. आणि त्याच उमेदवाराने टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची? आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दुसरी कोणती परीक्षा आहे का याची चौकशी केली नसेल का असा प्रश्न आता परीक्षार्थी विचारत आहेत. विशेष म्हणजे टीईटीची परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार होती. त्यादिवशी युपीएससीची असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती आणि ३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आता राज्यभर घेण्यात येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT