Ambernath News अजय दुधाणे
मुंबई/पुणे

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं चाकूने भोसकलं; आरोपीला बेड्या

अंबरनाथच्या आंबेडकर नगरमधील घटनेनं खळबळ

अजय दुधाणे

अंबरनाथ - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एका तरुणाने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या इसमाला चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या (Ambernath) आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Police) हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील पाहा -

अंबरनाथच्या आंबेडकर नगरमधील रोहिदास गल्लीत रवींद्र सोनवणे हे ५२ वर्षीय इसम वास्तव्याला आहेत. त्यांच्याच गल्लीत प्रशांत उर्फ बबलू राजगुरू हा २४ वर्षांचा तरुण राहतो. गुरुवारी २६ मे रोजी रवींद्र सोनवणे हे त्यांच्या घरात असताना बबलू तिथे आला आणि त्याने रवींद्र यांना दारूपिण्यासाठी पैसे मागितले. मात्र रवींद्र यांनी त्याला नकार दिल्यानं बबलूने त्यांच्या घरातील टीव्ही, स्लायडिंगच्या खिडक्या, पंखा आणि अन्य सामानाची तोडफोड केली.

यावेळी रवींद्र हे बबलूला घराबाहेर काढत असताना त्याने रवींद्र यांच्या पोटात चाकूने ३ वेळा भोसकलं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रवींद्र यांना कल्याणच्या फोर्टीस रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी बबलू राजगुरू याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नासह अन्य गुन्हे दाखल करत त्याला बेड्या ठोकल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jannat Zubair Attack: प्रसिद्ध अभिनेत्री आणि भावावर पनवेलमध्ये हल्ला? सोशल मीडियावरील ती पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: चिपळूणमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रदूषण कार्यालयात नागरिकांची धडक

प्रशासनात पुन्हा फेरबदल; बड्या IAS अधिकाऱ्याची अचानक बदली, कुठे होणार नियुक्ती?

Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Saibaba Temple: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT