Nawab Malik  Saam Tv
मुंबई/पुणे

हसीना पारकरचा बॉडीगार्ड राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा

'दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेलला या आपण २००२ पासून ओळखत होतो.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकणी अनेक दिवसांपासून तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आता एक खळबळजनक खुलासा केला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा (Hasina Parkar) बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारा सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी ईडीच्या जबाबात सांगितल्याचं समोर आली आहे.

मलिक यांच्याविरोधात ED ने दाखल केलेल्या आरोपत्रात मुंबईतील गोवावाला कंपाऊड संदर्भात जाब जबाब सुरु असताना त्यांनी ही माहिती सांगितली आहे. तसंच त्यांनी सलीम पटेलबाबत अनेक खुलासे केले आहेत.

हे देखील पाहा -

सलीम पटेल (Salim Patel) हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा होता, तसंच हसीना पारकरने केलेल्या व्यवहारांची त्याला माहिती असायची, गोवावाला कंपाउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीमला मलिक यांच्याकडून १५ लाख मिळले होते. नवाब मलिक यांचा भाऊ अस्लम मलिक यांचीही गोवावाला कंपाउंडच्या संबंधित व्यवहारात सहभाग असल्याचे चौकशीतून समोर आलं आहे.

तसंच, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेलला या आपण २००२ पासून ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. राष्ट्रवादीचे त्यावेळचे मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करायचा, गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी आपणास माहिती नव्हत्या, असही मलिक म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Liquor Ban : सलग ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

Bank Scam: SBI च्या ग्राहकांनो सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय? सेकंदातच होईल अकाऊंट रिकामं

SCROLL FOR NEXT