Hasan Mushrif Saam Tv
मुंबई/पुणे

हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या; पुणे न्यायालयात याचिका दाखल

हसन मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे समोर आणत आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी ठरत आहेत. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा चालवून आल्यानंतर आता त्यांनी आणखी एका मंत्र्याचा नंबर आहे असं म्हणत किरीट सोमय्या घोटाळे उघडकीस आणत आहेत.

हे देखील पहा -

किरीट सोमय्या यांनी थेट हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज शुक्रवारी किरीट सोमय्या पुण्याला जाणार असून, हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, अशी माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे.

किरीट सोमय्या ट्विट करत म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक, शेल आणि बनावट कंपन्यासाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची मागणी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT