Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

"भोंग्यांमुळे त्रास होतोय तर राज ठाकरेंनी भोंग्यांशिवाय सभा करावी"

'सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राज्यभर निषेधार्थ मोर्चे काढू.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : जर भोंग्यांमुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून,भोंगे, स्पीकरशिवाय सभा करावी. तसंच राज यांच्या सभेत जर पुन्हा कोणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जिम्मेदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) अल्पसंख्यक विभागाच्या प्रदेश संघटक सचीव हलिमाताई शेख यांनी केले आहे. .

तसंच औरंगाबाद (ीAurangabad) येथे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मेच्या सभेला पोलीसांनी सशर्त परवानगी दिली असली तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी जर सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग राज्यभर निषेधार्थ तीव्र मोर्चा काढेल असा इशारा देऊन हलिमा शेख यांनी जनतेला सभेला जाऊ नये असे आवाहन देखील केलं आहे.

राज ठाकरे मागील दोन्ही सभांमध्ये मशिंदीवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलच तापलं होतं. तसच राज यांनी समाजातील सलोखा बिघडवणारं वक्तव्य केल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जात होता. अशातच आता त्यांची आगामी सभेची जोरदार चर्चा सुरु असून या सभेत राज हे काय बोलणार याकडे मनसे सैनिकांच लक्ष आहे. तसंच राज ठाकरे पोलिसांनी घालून दिलेल्या मर्यादा पाळणार का याकडे विरोधकांसह प्रशासनाचं लक्ष असणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

SCROLL FOR NEXT