Gunratna Sadavarte  SaamTvNews
मुंबई/पुणे

गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अटकेची शक्यता

सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलीस पोहोचले असून, त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे दिलेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. या नंतर कामगारांनी आजचे हे हिसंक आंदोलन केले त्यामुळे गुणरत्न यांना ताब्यात घेतले आहे

सदावर्तेंना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे. चौकशीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी चपला फेकल्या. शरद पवारांच्या घरावर हल्ला निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुंबई पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे.

हे देखील पहा :

यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. सदावर्तेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. तेथे त्यांची चौकशी केली जाणार आहे. यानंतर कदाचित त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी गुणरत्ने सदावर्ते यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'माझी हत्या होऊ शकते. माझ्या पत्नीने दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर मला कोणत्याही स्वरुपाची नोटीस न देता पोलिस (Police) मला घेऊन जात आहेत.' दरम्यान, गुणरत्ने सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवून शरद पवारांच्या निवासस्थानी पाठवले असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT