Navi Mumbai Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Navi Mumbai: सानपाडा डिमार्ट परिसरात गोळीबार, एक जण जखमी; आरोपी बाईकवरून फरार

Navi Mumbai Firing News: नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात भर दिवसा गोळीबाराचा प्रकार घडलाय. पाच ते सहा राऊंड गोळबार करून आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी सानपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडलाय. पाच ते सहा राऊंड गोळबार करून दोन आरोपी फरार झाले आहेत. या गोळीबारात राजाराम ठोके जखमी झाले असल्याची माहिती आहे. भर दिवसा सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं, नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकणानंतर नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डी मार्ट आहे. डी मार्टच्या बाजूलाच आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती आहे. सानपाड्यातील स्टेशननजीकचा रस्ता कायम वर्दळीचा असतो. या रस्त्यावर अनेक लोक ये- जा करीत असतात. भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरीकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गोळीबार करणारे दोन आरोपी होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत.

सानपाडा परिसरातील डी - मार्ट जवळ, गोळीबार करणारे दोन्ही आरोपी दुचाकीवरून आले होते. सानपाड्यातील नजीकच्या परीसरात येऊन आरोपींनी राजाराम ठोके या व्यक्तीवर गोळीबार केला. जवळपास पाच ते सहा राऊंड आरोपींनी गोळीबार केला. दोन ते तीन गोळ्या राजाराम यांना लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी व्यक्तीला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आरोपींनी केलेल्या ५-६ राऊंड गोळीबारात राजाराम यांना दोन ते तीन गोळी लागल्याची शक्यता आहे. जखमी व्यक्तीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची चर्चा आहे. धक्कादायक घडलेल्या घटनेनंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपी कुठल्या दिशेनं फरार झाले आहेत, या संदर्भातील सीसीटिव्ही फुटेज पोलीस तपासत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आणि फॉरेन्सिक टीम करीत आहेत.

नवी मुंबईत घटनेनंतर पोलीस उपायुक्त गुन्हे अमित काळे म्हणतात, 'सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास सानपाडा परिसरातील डी मार्टजवळ दोन आरोपींनी गोळीबार केला. या गोळीबारात राजाराम ठोके यांना २-३ गोळ्या लागल्याची शक्यता आहे. जखमी ठोके यांची तब्येत स्थिर असून, या प्रकरणी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करीत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Tata Aeris Launched: खुशखबर! ₹5.29 लाखांत आली टाटाची नवी कार, फीचर्सही जबरदस्त

Gold Vastu Tips: घरामध्ये सोनं ठेवण्यापूर्वी 5 महत्वाचे नियम लक्षात घ्या

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT