Gunaratna Sadavarte Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील त्यांची पोलीस कोठडी आजपर्यंत सुनावण्यात आली होती ती संपल्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले होते या सुनावणी दरम्यान सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

सदावर्तेंच्या मागील सुनावणीला देखील सातारा पोलीस (Satara Police) गिरगाव सत्र न्यायालयात ताबा मागण्यासाठी आले होते. अखेर आता न्यायालयाने सदावर्तें यांचा सातारा पोलिसांकडे दिला आहे. त्यानुसार आता १७ तारखेपर्यंत सदावर्तेंंचा ताबा सातारा पोलिसांकडे उद्या दिला जाणार आहे. तर सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे देखील पहा -

का मागितला सातारा पोलिसांनी ताबा -

वकील गुणरत्न सदाववर्ते यांच्या विरोधात फलटण येथे सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती अशी प्राथमिक माहिती कळत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT