Government; राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याच्या मनस्थितीत- उदय सामंत  Saam Tv
मुंबई/पुणे

Government; राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याच्या मनस्थितीत- उदय सामंत

राज्यात काही जिल्ह्यामध्ये मागील २ दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यामध्ये मागील २ दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीने महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या नैसर्गि‍क आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नसल्याने किंवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत.

अशा उमेदवारांनी ई- मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटी दरम्यान परीक्षा देवू न शकल्याचे विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंगू, मलेरीया, टायफाईड इ. साथीचे आजार, ट्राफिक, रोड दुर्घटना इ. मुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अनेक अडचणी निर्माण होते.

हे देखील पहा-

एकाच दिवशी २ परीक्षा आल्यामुळे, परीक्षेचे पहिले सत्र ३० मिनिटाच्या आतच तांत्रिक अडचण निर्माण होते. परीक्षेला प्रत्यक्ष हजर असून सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पुर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत. अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक देखील झाली आहे. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होणार आहे.

टास्क फोर्ससोबत चर्चा करून, एसओपी बनवली जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होणार आहे. १ नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु, तेव्हाच दिवाळी असल्याने कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार होत आहे. विद्यार्थ्यांनी यायचे की नाही, हे त्यांनी ठरवावे. सक्ती नसणार आहे. कोरोना कमी झालेला आहे. तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT