Pune Lonavala Local Time Table 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Pune Lonavala Local: प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकलच्या दोन फेऱ्या वाढल्या; जाणून घ्या वेळ...

Pune Lonavala Local News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते लोणावळा दरम्यान दोन लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Satish Daud

Pune Lonavala Local Time Table 2024

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते लोणावळा दरम्यान दोन लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारच्या वेळेत या लोकल धावणार असून यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या फायदा होणार आहे. कोरोना संकटाच्या काळात पुणे-लोणावळा लोकलसेवा बंद करण्यात आली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोनाचे सावट संपल्यानंतर पुन्हा पुणे-लोणावळा लोकलसेवा सुरू करण्यात आली. मात्र, दुपारच्या टप्प्यातील लोकल सेवा बंदच होती. त्यामुळे विद्यार्थी व कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. (Latest Marathi News)

त्यामुळे दुपारची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र, दुपारच्या टप्प्यात देखभाल दुरूस्तीची कामे केली जात असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून लोकल सेवा सुरू करण्यास नकार दिला जात होता.

यामुळे प्रवासी आक्रमक झाले होते. मागील आठवड्यात प्रवाशांनी याच मागणीसाठी लोणावळा येथे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस अडवून आंदोलन केले होते. अडविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे विभागाने पुणे-लोणावळा दरम्यान दोन फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील एक लोकल शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी 12.05 वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी 01.20 वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल. तर लोणावळा स्थानकावरून सकाळी 11.30 वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी 12.45 वाजता शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT