Mumbai Metro SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! घाटकोपर- अंधेरी विशेष मेट्रो धावणार; कधीपासून सुरू होणार?

Ghatkopar- Andheri Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोला मुंबईकरांकडून खूप चांगली पसंती मिळते. पण या मार्गावर सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मेट्रो-१ व्यवस्थापनाने घाटकोपर- अंधेरी विशेष मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Priya More

मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच घाटकोपर ते अंधेरीदरम्यान विशेष मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. घाटकोपरवरून वर्सोवाऐवजी घाटकोपर -अंधेरी ही विशेष आणि थेट मेट्रो धावणार आहे. सकाळच्या गर्दीवर मात करण्यासाठी मेट्रो- १ अशाप्रकारचे नियोजन करताना दिसत आहे. यामुळे घाटकोरवरून अंधेरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होण्यास मदत होईल.

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोला प्रवाशांकडून खूप चांगली पसंती मिळते. या मेट्रोला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. याच गर्दीवर मात करण्यासाठी मेट्रो- १ व्यवस्थापन नियोजन करत आहे. यासाठी घाटकोपर ते अंधेरी अशी विशेष आणि थेट मेट्रो धावणार आहे. त्यासाठी चाचणी मेट्रो चालवण्यात आली आहे.

२०२४ मध्ये घाटकोपर -वर्सोवा- घाटकोपर ही मेट्रो सेवा सुरू झाली होती. ही राज्यातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेली मार्गिका आहे. या मार्गावर दिवसाला ४.८० लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. महत्वाचे म्हणजे हा मेट्रोमार्ग प्रवाशांच्या पसंतीचा आहे. या मार्गावर फक्त ४ डब्यांची मेट्रो धावते. त्यामुळे सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते. घाटकोपर ते अंधेरी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता या मार्गावर विशेष मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.

मेट्रो प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मेट्रोने घाटकोपर ते अंधेरीदरम्यान विशेष आणि थेट मेट्रो गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर घाटकोपर-अंधेरी शटल सुरू झाल्यास प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवास करताना येईल. सध्या मेट्रो -१ प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT