MSRTC  SaamTV
मुंबई/पुणे

MSRTC Employees : एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

राज्यातील एसटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

साम टिव्ही ब्युरो

MSRTC Employees : राज्यातील एसटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कामगारांनी केलेली महागाई भत्ता वाढवण्याची मागणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. एसटी कामगारांच्या विविध मागण्या लक्षात घेता, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra News)

मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं निर्णयाचा धडाका लावला आहे. आज (१८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कामगारांसोबत (MSRTC) एक बैठक घेतली. या बैठकीत एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यावर चर्चा करण्यात आली.

यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबतचा निर्णय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. आज अखेर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.  

एसटी कामगारांनी काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. एसटी कामगारांचा हा संप तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालला होता. या संपामुळे महाराष्ट्रातील शेकडो गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता. नागरिकांना प्रचंड तासाला सामोरं जावं लागलं होतं. ठाकरे सरकारने एसटी कामागारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: जेवल्यानंतर या ७ चुका केल्याने वजन कधीच कमी होतं नाही, तुम्हीही करताय का चुका?

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

SCROLL FOR NEXT