Pune: दीडशेहून अधिक सीसीटीव्ही चेक करत सराईत सोनसाखळी चोर जेरबंद अमोल कविटकर
मुंबई/पुणे

Pune: दीडशेहून अधिक सीसीटीव्ही चेक करत सराईत सोनसाखळी चोर जेरबंद

गुन्ह्यातील तीन तोळे वजनाचे सोनसाखळी हस्तगत करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश

अमोल कविटकर, पुणे

पुणे - दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून विश्रांतवाडी पोलिसांनी २ सराईत सोनसाखळी चोरांना जेरबंद केले आहे. चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अशोक गंगावणे व अनिल रघुनाथ बिरदवडे या दोन सोनसाखळी चोरांसह गुन्ह्यातील सोने खरेदी करणारा सोनार आकाश सोनार याला देखील अटक करण्यात आली आहे.

विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी विश्रांतवाडी कळस येथील विशाल परिसर या ठिकाणी हबिबा शेख घराच्या बाहेरील बाकावर बसलेले असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून पळून गेले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रफुल मोरे, शेखर खराडे ,संदीप देवकते यांनी कळस येथून बारामती पर्यंत अंदाजे दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केल्यानंतर या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागला.

सदरचे आरोपी बारामती येथील 29 फाटा याठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार दिपक चव्हाण व शिपाई संदिप देवकाते यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती.त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन तोळे वजनाचे सोनसाखळी हस्तगत करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mountain Climbers Benefits: वजन झपाट्याने कमी करायचं आहे? मग सकाळची सुरुवात माउंटेन क्लाइंबर्सने करा

Maharashtra News Live Update: मुंबईतील गर्जना मोर्चामध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार पोस्टरबाजी

PM Kisan Yojana : ...तर PM किसान योजनेचा २४ वा हप्ता येणार नाही खात्यात; आजचं करा 'ही' महत्त्वाची ४ कामे

Konkan Village : मोबाईल बाजूला ठेवा अन् निसर्गाचा आनंद घ्या! सुट्टीत फिरा कोकणात 'हे' सुंदर गाव

Kidney : दररोजच्या 'या' ७ सवयी तुमच्या किडनीचा करतायेत सत्यानाश, आताच जागे व्हा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT