Arvind Sawant Saam Tv
मुंबई/पुणे

Arvind Sawant: 'त्या' १४ खासदारांची नावे द्या; अरविंद सावंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (ShivSena) १४ खासदार शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत या संदर्भात शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या चर्चांवर आज शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेनेचे १४ कोणते खासदार शिंदे गटासोबत जाणार आहेत, त्यांची नावे द्या असं आवाहन सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केले.

राष्ट्रपती निवडणुकी बाबत उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितलं की मी सर्व खासदारांसोबत चर्चा करून निर्णय घेईल. आज दुपारी खासदारांची बैठक लावली आहे. त्या बैठकीनंतर निर्णय होईल. १४ जणांचा शिवसेना खासदारांचा ग्रुप आहे सांगत आहात तर त्या १४ जणांची नावे आम्हाला द्या ती जाहीर करा, असं आवाहनही अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केले.

पक्षप्रमुखांच्या समोर आमचे मत मांडायला आमचा अधिकार आहे. कोणीही आम्हाला रोखलेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिहिलेल्या संविधानवर घाव घालण्याचा जे काम होतय याची मला चिंता वाटते. दोन तृतीयांश लोक पक्षातून बाहेर पडू शकत नाहीत. तर त्यांचा वेगळा गट त्यांना प्रस्थापित करता येत नाही. कायद्यात तो गट मर्ज करायचा सांगितले आहे, असंही सावंत (Arvind Sawant) म्हणाले.

आज सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय हा कोणाला दिलासा आहे? बेकायदेशीर तयार झालेल्या सरकारला संरक्षण देण्याचे काम केले जाते आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत, असंही सावंत म्हणाले. सरकार बेकायदेशीर असेल तर पुढे सुद्धा सर्व बेकायदेशीर चालेल. जे लोक पक्ष द्रोह करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे, असंही अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT