mumbai crime news  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत धक्कादायक घटना; मित्राने मैत्रिणीला भरलं पोत्यात, त्यानंतर...

आरोपीनं तरुणीची हत्या करुन तिला पोत्यात भरुन माहीम ट्रॅकजवळ फेकलं होतं.

सुरज सावंत

मुंबई : माहीम रेल्वे ट्रॅकजवळ एका पोत्यात अज्ञात तरुणीचा मृददेह (Girl Death) आढळल्याने खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यावर रेल्वे पोलिसांनी (Railway police) तातडीनं गोरेगावमधून आरोपीला अटक केलीय. सदर आरोपीनं मैत्रीचे संबंध असलेल्या तरुणीसोबत वादविवाद केला होता. त्यानंतर त्याने तरुणीची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आलीय. मृत तरुणी २५-३० वयोगटातील आहे. आरोपीनं तरुणीची हत्या करुन तिला पोत्यात भरुन माहीम ट्रॅकजवळ फेकलं होतं. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहीम रेल्वे ट्रॅकजवळ एका पोत्यात तरुणीचा मृतदेह आढळला आहे. काही कारणांवरुन गोरेगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या मैत्रीणीचा खून केला. त्यानंतर मृत तरुणीला पोत्यात भरुन माहीम ट्रॅकजवळ फेकून दिलं.मुंबईतील दिंडोशी भागात मृत महिला राहत होती. तरुणीची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला गोरेगाव येथून रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. पोलीस आरोपीला उद्या न्यायालयात हजर करणार आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT