Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

संतापजनक! गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन सामुहिक बलात्कार, पार्टीत तरूणीच्या घरी नेमकं काय घडलं?

पार्टीनिमित्त घरी आलेल्या ओळखीच्या तरुणांनी एका तरुणीवर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पार्टीनिमित्त घरी आलेल्या ओळखीच्या तरुणांनी एका तरुणीवर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Police) राकेश आढाव राहणार विमाननगर , मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्फउद्दीन, मोहम्मद शरीफनवाज सर्फउद्दीन दोघेही राहणार औरंगाबाद यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा (Kondhwa) येथील एका सोसायटीमध्ये ९ तारखेला पीडित तरुणीच्या मैत्रिणीने त्यांच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे आयोजन केले होतं. या पार्टीसाठी पीडित तरुणीच्या मैत्रिणीने तिचे मित्र राकेश, मोहम्मद यांना देखील बोलावलं होते.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी आराम करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली तिथेच तिची झोप लागली. ती झोपलेली पाहून तिन आरोपींनी तिच्या तोंडावरती गुंगीचं औषध मारुण तिला आधी बेशुद्ध केलं आणि तिच्यावरती तिघांनी बलात्कार केला.

गुंगी उतरल्यानंतर पीडित मुलगी शुद्धीवर येताच तिला आपल्यासोबत काही तरी विपरित घडल्याचं समताच तिने त्या तिघांविरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि घटनेचे गांभिर्य ओळखत कोंढवा पोलिसांनी तिघांनाही तत्काळ अटक केली. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT