drug Saam Tv
मुंबई/पुणे

8 लाख 20 हजार किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त; नायजेरियन महिलेसह एक अटकेत

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटची कारवाई

सुरज सावंत

मुंबई: मुंबई अँटी नार्कोटिक्स (Anti-Narcotics) सेलच्या घाटकोपर युनिटने दोन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. यातील एक नायजेरियन महिला ड्रग (Drugs) डीलर आहे. घाटकोपर युनिटने 82 ग्रॅम एमडी ड्रग्ज (Drugs) जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 8 लाख 20 हजार रुपये आहे.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून एएनसीने पुढील तपास सुरू केला आहे. गोरेगाव येथील दूधसागर सोसायटी बस स्टॉपजवळ 28 वर्षीय आफ्रिकन महिला ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एएनसी अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पेडलरला अटक करण्यात आली.

चौकशीनंतर अफजल सय्यद याचे नाव समोर आले आहे. अधिक तपासात मालाडमध्ये एका ३९ वर्षीय व्यक्तीकडून ५२ ग्रॅम ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT