कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लवकरात लवकर कामे पूर्ण करा - आमदार अतुल भातखळकर सुशांत सावंत
मुंबई/पुणे

कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लवकरात लवकर कामे पूर्ण करा - आमदार अतुल भातखळकर

कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लवकरात लवकर कामे पूर्ण करा असे निर्देश भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली मतदारसंघातील कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारा बाणडोंगरी डीपी रोड असो किंवा आकुर्ली क्रॉस रोड असो, एमईएस नाला रुंदीकरण असो किंवा १८ जुलैच्या अतिवृष्टीमुळे घर गमावलेल्या बाधितांना पर्यायी घरे देणे असो कांदिवली मतदारसंघातील अशी अतिमहत्त्वाची कामे पूर्ण व्हावी याकरिता मी पाठपुरावा करत असताना सुद्धा केवळ फाईल या विभागातून त्या विभागात फिरविण्याचे काम केले जात असल्याचे दिसत आहे, त्यामुळे केवळ कागदी घोडे न नाचवता काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आज भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Get things done faster than paperwork - MLA Atul Bhatkhalkar)

हे देखील पहा -

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मनपा आर दक्षिण यांच्या कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने पोयसर डीपी रोड, महिंद्रा कंपनीतून जाणारा डीपी रोड, लोखंडवाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित भूखंड हस्तांतरण, आकुर्ली रोडवरील मनपा प्रसुतीगृहाचे काम, प्रमोद महाजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सोयीसुविधा उभारणे, बिहारी टेकडी रस्ता, मलनिस्सारण वाहिन्याचे रुंदीकरण, म्हाडा वसाहतीतील मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्यवाहिन्या व सिमेंट रस्त्याची कामे, पोयसर येथील रेल्वे सबवे रुंदीकरण, कांदिवलीतील विविध ठिकाणी असलेली कचरा समस्या, या आणि अशा अनेक समस्या संदर्भात विस्तृत चर्चा करून विकास कामांमध्ये दिरंगाई न करता लवकरात लवकर कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या सूचना सुद्धा आ. भातखळकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका सुनिता यादव, सुरेखा पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, भाजपा पदाधिकारी सुधीर शिंदे, संजय जैस्वाल, नितिन चौहान आदी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT