GB Syndrome  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune GBS News: पुणेकरांना काहिसा दिलासा! २४ तासांत जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही, रुग्णसंख्या १३० वर स्थिर

Guillain-Barre Syndrome: पुण्यात गेल्या २४ तासांत एक ही जीबीएस रुग्णाची नोंद झाली नाही. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १३० वर स्थिर झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

Priya More

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जीबीएस आजाराने थैमान घातलं आहे. जीबी सिंड्रोम आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे पुणेकरांचे टेन्शन वाढलं होतं. या आजारामुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला.

पहिला मृत्यू सोलापुरात तर दुसरा मृत्यू पुण्यामध्ये गेला. त्यामुळे पुणेकर चांगलेच धास्तावले आहेत. पण आता पुणेकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. कारण पुण्यात गेल्या २४ तासामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेला एकही रुग्ण सापडला नाही. रुग्णांची सख्या १३० वर स्थिर झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या २४ तासांत एक ही जीबीएस रुग्णाची नोंद झाली नाही. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १३० वर स्थिर झाली आहे. यामधील २५ रुग्ण पुणे शहरातील असून इतर ७४ रुग्ण पुणे महापालिकेच्या नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील आहेत. एकूण रूग्णांपैकी २० रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय यासह इतर रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यामध्ये बुधवारी जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णआंची संख्या १३० वर पोहचली आहे. फक्त पुण्यातच नाही तर सोलापूर आणि सांगली याठिकाणी जीबी सिंड्रोमची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT