Gaurav Aahuja Arrested saam tv
मुंबई/पुणे

Gaurav Aahuja Arrested: पुण्यात नंगानाच करणारा गजाआड, गौरव अहुजाला 1 दिवसाची पोलिस कोठडी

Pune: पुण्यात सार्वजनिक ठिकाणी नग्न नाच करणाऱ्या गौरव अहुजाला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आता त्याने मद्य आणि ड्रग्ज घेतले होते का, याचा तपास सुरू आहे.

Dhanshri Shintre

पुण्यात भर रस्त्यात नंगानाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव अहुजाला कोर्टानं पोलिस कोठडी सुनावली आहे. गौरवने मद्यासह ड्रग्जही घेतले होते का? त्या दिशेनेही पोलिसांचा तपास होणार आहे. पुण्यात भर रस्त्यात नंगानाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव अहुजा विरोधात संतापाचं वातावरण आहे.

पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या मित्राची सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रस्त्यावर प्रवास करणारी लहान मुलं, स्त्रिया यांची पर्वा न करता भर चौकात अश्लिल चाळे करणारा, लघुशंका करणारा गौरवचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुणेकर संतप्त झाले.

त्याच्या वडीलांनीही उद्विग्न होत प्रतिक्रीया दिली. त्यानंतर या बड्या बापाच्या माजुरड्या मुलांनं माफीसाठी गयावया केली. स्वत: व्हिडिओ पोस्ट करत मी आठ तासात समर्पण करतो असं म्हटलं. पण हे आठ तास त्यानं का घेतले? गौरवने मद्यासह ड्रग्जही घेतले होते का? आणि म्हणूनच त्यानं हा वेळ तर मागितला नाही ना. या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्याच्या BMW गाडीचा शोधही पोलिसांकडून सुरु आहे.

बड्या बापाच्या वाया गेलेल्या हा निर्लज्ज गौरव भर रस्त्यात नंगानाच करत होता. यावेळी गाडीत बसलेला त्याचा मित्र भाग्येश आपला मित्र मोठा पराक्रम करतोय अशा अविर्भावात दात काढत होता. मुख्य म्हणजे भाग्येशच्या हातात दारूची बाटली होती. त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली असून भावेशच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळंलय.

पण इतकंच होऊनही त्यांचा माज काही कमी झाला नाही. अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केला. चक्क पोलीस स्टेशनमध्येच मित्र भाग्येशसाठी कोल्ड कॉफी,बर्गर आणि कोल्ड ड्रिंक घेऊन आले. मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलं आहेत.

पुण्यात अशा श्रीमंत, बिघडलेल्या मुलांच्या बुद्धीला अश्लिलतेची वाळवी लागलीये का असा सवाल उपस्थित होतोय. कोयत्या गँगचे हल्ले, पोर्शे अपघात प्रकरण, ड्रग्जचा विळखा, स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण आणि आता भर रस्त्यात नंगानाच यामुळे पुण्यात पोलिस यंत्रणेचा धाक उरला नाही, हे वास्तव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT