Gas tanker explosion at Mohitewadi on Chakan-Shikrapur route Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Gas tanker explosion at Pune : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे.

Satish Daud

रोहिदास गाडगे, साम टीव्ही पुणे

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे. मोहितेवाडी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांची पडझड झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. टँकरचा स्फोट झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांना आग लागली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. टँकरमधून गॅस गळती झाल्याने आग लागून हा स्फोट झाल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी परिसरात एक जेवणाचा ढाबा आहे. या ढाब्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता.

अचानक या टँकरला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. क्षणार्धात गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे जवळपास एक किलोमीटरपर्यंत जाणवले. कानठळ्या बसणारा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले.

गॅसच्या स्फोटाने महामार्गालगत असलेल्या अनेक घरांच्या काचा फुटल्या. तसेच काही घरांची पडझड देखील झाली. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार मिळणार ७०,०००; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Ishaan Kisan Girlfriend Aditi Hundia Networth: ईशान किशनची होणारी बायको अदिती हुंडियाची संपत्ती किती?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Bigg Boss Marathi 6 : करण सोनावणेच्या घराबाहेर जाण्याने प्राजक्ता भावुक, घट्ट मिठी मारली अन्..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT