गॅस गोडाऊन परिसरात रस्ते गेले वाहून; रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी अजय दुधाणे
मुंबई/पुणे

गॅस गोडाऊन परिसरात रस्ते गेले वाहून; रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

गॅस गोडाऊन ते मैखाना रस्त्याची खड्ड्यांनी चाळण

अजय दुधाणे

अंबरनाथ - अंबरनाथ Ambernath पूर्वेतील गॅस गोडाऊन Gas Godownपरिसरात रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत. गॅस गोडाऊन ते मैखाना पर्यंतच्या रस्त्याची तर खड्ड्यांनी पुरती चाळण झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

हे देखील पहा -

अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मीनगर चौकाकडून एक रास्ता नवरे नगरच्या दिशेने जातो. या रस्त्यावर मैखाना ते गॅस गोडाऊन या पट्ट्यात गायत्री बिल्डिंगच्या समोरच तब्बल १० ते १५ फूट लांबीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून गाड्या चालवताना कितीही खड्डे वाचवण्याचा प्रयत्न केला तरी गाडी शेवटी खड्ड्यात जातेच अशी अवस्था झाली आहे.

यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे पादचारी, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक यांनी तर या रस्त्यावरून चालावं तरी कसं? असा प्रश्न या रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी जमा झाल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज देखील येत नसून त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता या रस्त्यावर तातडीने डागडुजी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT