Ganpat Gaikwad Firing Case Update: Saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Firing Case : मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात हजर करणार

Ganpat Gaikwad firing case : आज बुधवारी आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उल्हासनगर कोर्टात न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar Firing Case :

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांना उल्हासनगर न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ते पोलीस बंदोबस्तात कळवा येथील पोलीस कोठडीत होते. आज बुधवारी आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उल्हासनगर कोर्टात न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर हजर केले जाणार आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आरोपीमध्ये स्वतः आमदार गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा,संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज बुधवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रकरण संवेदनशील असल्याने ठाणे पोलीस आयुक्तानातून यासंबंधी आदेश काढण्यात आले आहेत. यावेळी उल्हासनगर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्याशिवाय कोर्टात येणारे जाणारे मार्ग 200 मीटर लांबपर्यंत बंद करण्यात येणार आहेत.

सुरक्षेच्या हेतूने विशेष आदेश हे ठाणे पोलीस आयुक्तालय विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी काढले आहेत. बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याशिवाय न्यायालयाच्या बाहेर कोणत्याही बाजूने २०० मीटर अंतराच्या परिसरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, सायबर कॅफे, टेलिफोन बुथ, हॉटेल/चहा टपरी, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या मनाई आदेशानुसार बुधवारी सकाळी ९ वाजता ते आरोपीचे न्यायालयातील कामकाज पूर्ण होईपर्यंत आणि आरोपी जाईपर्यंत या कालावधी दरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत चोपडा न्यायालयाच्या भोवती २०० मीटर परिसराकरिता अंमलात राहील.

यावेळी या आदेशाची प्रत दर्शनीय भागावर लावण्यात येणार आहे. तसेच हा आदेश ध्वनिक्षेपकद्वारे जाहीर करण्यात येऊन प्रसिद्धी देण्यात येणार आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT