Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Ganpati in Germany : पुण्याचा मानाचा गणपती निघाला जर्मनीला, म्युनिकमध्ये विराजमान होणार तुळशीबाग गणपतीची प्रतिकृती

Ganpati News : रांध्याच्या पर्यावरणपूरक वस्तूपासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबागेचा गणपती बाप्पा थेट जर्मनीत पोहोचला आहे. जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळ म्युनिक येथे पुण्यातील तुळशीबाग मंडळाचा गणपती विराजमान होणार आहे.

पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिकृती जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळ म्युनिक या मराठी भाषिकांच्या युरोपमधील एक अग्रणी संस्थेतील गणेशोत्सवात विराजमान होणार आहे. रांध्याच्या पर्यावरणपूरक वस्तूपासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

जर्मनीतील संस्थेचे प्रतिनिधी अद्वैत खरे यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली आहे. शिल्पकार विपुल खटावकर यांनी ही कलाकृती साकारली आहे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकमध्ये विधिवध पूजा केली जाणार आहे. (Mumbai News)

पुण्यासह मुंबईत गणोशोत्सावानिमित्त मंडळे तयारीला लागले आहेत. मुंबई, पुण्यातील अनेक मोठ्या मंडळांनी गणपती मंडपात आणले आहेत. मुंबईतही रविवारी अनेक मोठे गणपतींचं आगमन झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Local Body Election : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता, महायुतीच्या मंत्र्याने निवडणुकीचं वेळापत्रकच सांगितलं

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT