ganesh naik saam tv
मुंबई/पुणे

Thane: गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपुर्व अर्जावर बुधवारी सुनावणी

मला गणेश नाईक म्हणतात तूम्ही अमेरिकेस जावा असे पिडित महिलेने माध्यमांशी बाेलताना सांगितले.

विकास काटे, ठाणे

ठाणे : भाजपचे नेते गणेश नाईक (ganesh naik) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. महिलेस धमकवणे आणि बलात्कारा प्रकरणी गणेश नाईक यांनी ठाणे न्यायायालयात (thane court) अटकपूर्व जामीन अर्ज (pre arrest bail application) गुरुवारी दाखल केला होता. त्यावर आज (शुक्रवार) सुनावणी हाेणार हाेती. दरम्यान नाईक यांच्या वकीलांकडून आणखी एक नवे वकीलपत्र सादर करण्यात आले असून आज न्यायालयात काेणताही युक्तीवाद झाला नाही. येत्या २७ एप्रिलला पुढील सुनावणी हाेणार आहे. (ganesh naik latest marathi news)

आज ठाणे न्यायालयाच्या बाहेर माध्यमांशी बाेलताना पीडित महिलेच्या वकील लूसी मेस्सी म्हणाल्या आज कुठलाही युक्तिवाद झालेला नाही. त्यांच्याकडून (नाईक) एक नवीन वकीलपत्र सादर झाले. पाेलीसांबाबतच्या प्रश्नांना पाेलीसच उत्तर देऊ शकतील असेही मेस्सींनी नमूद केले.

दरम्यान फिर्यादी दीपा चव्हाण यांनी न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे जाणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या आम्हांला न्याय मिळावा यासाठी सरकारची मदत घेणार आहाेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT