दुहेरी मोकातील आरोपी गणेश गायकवाडची फिर्यादीलाच फ्रेंड्स रिक्वेस्ट?  Saam Tv
मुंबई/पुणे

दुहेरी मोकातील आरोपी गणेश गायकवाडची फिर्यादीलाच फ्रेंड्स रिक्वेस्ट?

तुरुंगातही मोबाईलचा वापर?

अमोल कविटकर, पुणे

पुणे - दुहेरी मोक्का अंतर्गत उद्योगपती गायकवाड पिता-पुत्र येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. तरीही त्यातील कॉंग्रेसचे माजी पदाधिकारी असलेले गणेश गायकवाड हे सोशल मिडियाचा वापर करतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पिंपरी-चिंचवडमधील फिर्यादी महेश काटे यांना गणेश गायकवाड या फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट आली आहे. त्यामुळे ते घाबरून गेले असून त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली आहे.

हे देखील पहा -

गणेश गायकवाड हा येरवडा तुरुंगात असल्याने पुणे पोलिसांनी याबाबत तुरुंग प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे गणेश गायकवाड यांनी कारागृहातून मोबाईलचा वापर केला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, त्यासाठी तुरुंगातील सेलची झडती घ्यावी लागणार आहे. दुसरी शक्यता अशी देखील आहे की गणेश गायकवाड यांच्या फेसबुक अकाउंटचा तुरुंगाबाहेरील दुसरी व्यक्ती किंवा गणेश यांच्या सांगण्यावरून त्याचा बाहेरील साथीदार वापर करीत असल्याचीही शक्यता आहे. कालपर्यंत गणेशचे हे अकाउंट अॅक्टिव्ह होते, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांएवढी; जैन मुनींचं वादग्रस्त विधान

MI vs DC : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन अचानक बदलला, नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra Live News Update : मुंबईच्या जोगेश्वरी भागात मद्य प्राशन पत्नीने केला पतीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT